पशुखाद्याचे उत्पादन 1 लाखावरून 50 ते 60 हजारावर : दूध संघाचा अजब कारभार
बारामती(वार्ताहर): बारामती तालुका दूध उत्पादक संघाने जो उच्चांकी दर दिला आहे तो किती दिवस टिकणार याबाबत दूध उत्पादक शेतकर्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
बारामती दूध संघाने दिलेला दरापेक्षा इतर ठिकाणी एक ते दीड रूपयांची दर जास्त आहे. चार वर्षापूर्वी दूधाला 34 रूपये दर मिळाला होता. दूध उत्पादकांनी नेटाने दूध व्यवसाय वाढवला मात्र, कालांतराने दर कोसळले आणि पशुखाद्याचे दर वाढले यामध्ये अक्षरश: दूध व्यवसाय मोडकळीस आला. त्यामुळे दूध संघाच्या चेअरमनने मोठ-मोठ्या वृत्तातून उच्चांकी दराबाबत ढोल वाजवित आहेत मात्र हे दर किती दिवस टिकणार याबाबत शेतकर्यांना पडलेला प्रश्र्न आहे.
पुशखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. आताच्या पशुखाद्याच्या दरात व मागील दरात खूप मोठी तफावत आहे. पशुखाद्याचा दर्जा सुद्धा ढासळलेला असल्याचे काही शेतकरी आपआपसात बोलताना दिसत आहेत. पशुखाद्याचे वाढते दर, ढासळलेला दर्जा यामुळे दूध व्यवसायीक अडचणीत सापडलेला आहे. नुसती घोषणा करून चालत नाही तर प्रत्यक्षात पाहणे गरजेचे आहे. पशुखाद्य 1 लाख पोत्यांवरून 50 ते 60 हजार पोत्यावर आलेले असताना सुद्धा कामगार भरती सुरू असेल तर चेअरमन काय करीत आहेत याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.