बारामती(वार्ताहर): येथील विकासाचा पॅटर्नचा ज्याप्रमाणे संपूर्ण देशात ज्याप्रमाणे गणला जातो त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात सुद्धा बारामती पॅटर्न दिसत असल्याचे मत पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांनी व्यक्त केले.
लडकत सायन्स ऍकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी श्री. शेंडे बोलत होते. यावेळी डॉ.सचिन घोरपडे, प्राचार्य रामचंद्र वाघ, पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष अनिल लडकत, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर उपाध्यक्ष बाबासाहेब चौधर, बारामती पं.स. चे माजी सदस्य राजेश जाधव ग्रामपंचायत कार्हाटीचे सरपंच बी.के.जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे श्री.शेंडे म्हणाले की, विकासाच्या बाबतीत दूरदृष्टी असणारे राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या अथक प्रयत्नातून विकासाचा बारामती पॅटर्न जसा बनला आहे त्याच पद्धतीने विकसित बारामतीमध्ये सध्या शिक्षणाचा ही नवीन बारामती पॅटर्न निर्माण होत आहे ही समाधानाची बाब आहे.
या ऍकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे स्मार्ट बोर्ड टिचिंग सुविधा असून मुला व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम आणि अद्ययावत ग्रंथालय आहे.
याप्रसंगी डॉ.सचिन घोरपडे, अनिल लडकत, बी.के. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव लडकत यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रा.प्राजक्ता व प्रा.सिद्धी यांनी केले. सूत्रसंचालन आशिष कांबळे यांनी केले तर शेवटी आभार गणेश लडकत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.काळे, प्रा.माने, प्रा.आखाडे, प्रा.नितीन इ. मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.