बारामती(वार्ताहर): पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्धांना लुबाडणार्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन व जनजागृती बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केले आहे.
शहर व मोठ्या गावांमध्ये काही लोकं पोलिसांसारखा पेहराव करून डीबी पथकातील कर्मचार्यांसारखा हेअर कट करून गॉगल किंवा खाकी पँट वापरून पोलीस असल्याचे वृद्ध लोकांना महिलांना सांगतात समोर नाकाबंदी चालू आहे त्यामुळे गळ्यातील दागिने काढून आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा खिशात ठेवा असे सांगून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने दागिने काढतात व हातचलाखी करून दागिने घेऊन पळून जातात.
हे गुन्हेगार वृत्तीचे लोकं ज्या भागांमध्ये गर्दी विरळ आहे व वृद्ध दाम्पत्य एकटे जात असेल किंवा महिला एकटी जात असेल तर तिच्यासोबत हा प्रकार करतात. हे लोक गडबडून जातात व त्यामुळे चोरीचा प्रकार होतो.
हे गुन्हे करणारे लोक इराणी टोळी असते. गोरेगाव ते तसेच पोलिसांसारखे दुष्ट पुष्ट शरीरयष्टीने असणारे लोक असतात तरी या प्रकारे कोणीही सीआयडी पोलिस दागिने काढण्यास सांगत नाही.