अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठेनगर येथे प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने साजरी करण्यात आली.
19 फेब्रुवारी रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतीचा कार्यक्रम प्रदीप दादा गारटकर मित्रपरिवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदिप दादा गारटकर मित्र परिवाराचे अनेक खंदे समर्थक व विविध पक्षातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.अशोक मखरे व बहुजन नेते व माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे व स्थानिक नागरीक हे नेहमीच महापुरुषाच्या जयंतीचा कार्यक्रम राबवून जीवनाची वाटचाल करीत असतात. महापुरुषांमुळे व त्यांच्या संस्कारामुळे बहुजन समाज आहे ही भावना मनात ठेवून नेहमीच विविध उपक्रम राबवत आलेले आहेत.