नगरसेविका मयुरी शिंदेंच्या पाठपुराव्याला यश : भिमनगर येथे भव्यदिव्य असे दोन मजली सभामंडप होणार

बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.17 च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ.मयुरी सुरज शिंदे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे भिमनगर येथील भव्यदिव्य दोन मजली सभामंडप होणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सौ.शिंदे यांनी सांगितले.

नगर परिषद सर्वसाधारण सभा क्रमांक-8 मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी विषयपत्रिकेवर विषय घेण्यात आला यावेळी सभेमध्ये मयुरी शिंदे यांनी पीठासन अधिकार्‍यांना सूचना केली की दुरुस्ती करण्या ऐवजी त्या ठिकाणी आरसीसी बांधकाम व्हावे, भव्यदिव्य असे दोन मजली सभामंडप बांधण्यात यावे. सभामंडपामध्ये बेसमेंटमध्ये सामाजिक कार्यक्रम होतील व पहिल्या मजल्यावर व्यायाम शाळा उपलब्ध होईल, व्यायाम शाळेचे साहित्य बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलेले आहेत. तसेच दुसर्‍या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका करण्यात यावी.

प्रभाग क्रमांक 17 भीमनगर येथील ध्यानमंडप दुरुस्ती करणे, पाण्याची टाकी बसवणे व नळ कनेक्शन दुरुस्ती करणे, असा ठराव स्थायी समिती सभा क्र.1 दि. 15 मे 2017 रोजी मयुरी शिंदे यांच्या यादीनुसार घेण्यात आला होता या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते करण्यात आले होते परंतु स्थानिक लोकांचे म्हणणे होते की, भीमनगर येथे पूर्वीचे ध्यानमंडप असून ते खूप जुने व जीर्ण झालेले आहे सदर ध्यान मंडपामध्ये सामाजिक कार्यक्रम देखील होत असतात सदर ध्यान मंडप पाडून त्या ठिकाणी दोन मजली सभामंडप बांधून मिळावे या गोष्टीची दखल घेऊन दोन मजली सभामंडप बांधण्यात येणार आहे.

सौ.मयुरी शिंदे या सन 2017 पासून या कामाचा पाठपुरावा करत आहे. स्थानिक नागरिकांनी नगरसेविका मयुरी शिंदे यांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!