गोतंडी गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने जीवन जगावे त्यामुळे यशस्वी जीवन जगता येईल असे आवाहन गोतंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे यांनी केले.

युवकांना माझे आवाहन आहे की, आपण आपले जीवन जगताना आपल्या कुटुंबात, समाजात काम करताना, लोकशाही माध्यमातून काम करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना असेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घालून दिलेला मार्ग असेल, स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांनी तसेच गणपती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांची 157 वर्षांची राजवट उलथून लावण्याकरिता म्हणून गणेश उत्सव साजरा करण्याचे धोरण स्वीकारले.

यावेळी गोतंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे,परशुराम जाधव,आप्पा पाटील, हरिभाऊ खाडे, लोणकर भाऊसाहेब, पोपट नलवडे, पापत साहेब, बिबीशन नलवडे, आबा मारकड, छगन शेंडे, बापू पिसे, हौशीराव यादव, गंगाराम शेंडे, कांतीलाल कांबळे, प्रकाश मोरे, व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!