अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पुर्वीच्या लोकप्रतिनिधीने विकास न केल्याने मी इंदापूर तालुक्याचा आमदार झालो असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुर तालुक्यातील विरोध नेत्यांला टोला लगावला आहे.
आय.एम.डी.कामगार समन्वय संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कामगार सेल व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वालचंदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष व कामगार नेते शिवाजीराव खटकाळे(भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कामगार व शेतकरी मेळाव्यात श्री.भरणे बोलत होते.

यावेळी प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सतिश पांढरे, सागर मिसाळ, प्रताप पाटील, सचिन सपकाळ, शेखर काटे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.भरणे म्हणाले की, वालचंदनगरची परिस्थिती सध्या बिकट आहे, परंतु कामगारांनी घाबरून जावू नका लवकरच प्रश्र्न मार्गी लागतील. कोरोनाच्या काळात इंदापूर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला. सार्वजनिक बांधकाम खाते आपल्याकडे असल्याने तुमच्या घरचा वाढपी आहे असेही ते म्हणाले. मी विरोधात असताना सुद्धा तालुक्यासाठी 1300 कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा निधी आणला होता. नुकताच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून 10 कोटी आणला व यापैकी 3 कोटी रूपयांचा निधी वालचंदनगर परिसरासाठी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 19 वर्षात इंदापूरचा विकास झाला नाही. त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी विकास करण्याची गरज होती. विकास न केल्यानेच मी आमदार झालो अशीही खोचक टिका त्यांनी यावेळी केली. यावेळी बहुसंख्य कामगार व शेतकरी उपस्थित होते.