बारामती(वार्ताहर): आपली बारामती स्वच्छ, सुंदर व निरोगी बारामती या ब्रीद वाक्यानुसार समाजाचं आपणही काही तरी देणं लागतो या युक्तीप्रमाणे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेतर्फे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
झाडे आहेत मग आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडक उन्हाळा, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्र ही बदलत चालले आहे. त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर वृक्षारोपण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी श्री.महाडिक यांनी सांगितले.

यावेळी पोलीस जनसेवा संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अमिन शेख, बारामती नगरपरिषद उद्यान विभागाचे प्रमुख विजय शितोळे, माजिद पठाण, ऍड.अमोल सोनवणे, शकील इनामदार, अर्चना साळवे, रसिका पंडीत, आचार्य ऍकॅडमीचे रामराजे घोरपडे, पत्रकार तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजक पोलीस जनसेवा संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अमिन शेख व बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.