बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे नेतृत्व, बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली व बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांच्या प्रयत्नातून मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळास वॉल कम्पौंड, कॉंक्रीटीकरण व पत्राशेडला नुकतीच स्थायी समितीत मंजूरी मिळाली असून अल्पावधीतच याठिकाणी काम सुरू होणार आहे.
कै.बाजीराव काळे बालभवन इमारत शेजारील 266/10ड यामध्ये मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ आहे. याठिकाणी होत असलेला कचरा, मातीचे ढिगारे होते. स्थानिक लोकांचा येण्याजाण्याचा रस्ता बंद झाला होता हे पाहता स्थानिक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी नगरपरिषदेत याबाबत प्रस्ताव मांडला त्यास मंजूरी दिली.
मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळी करण्यात येणार्या खर्चाबाबात स्थानिक नगरसेवक सत्यव्रत काळे यांचे मुस्लिम समाजातून विशेषत: इनामदार कुटुंबियांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. दुरावस्था झालेल्या प्रार्थनास्थळाचे सुशोभिकरण झालेनंतर त्याठिकाणी ये-जा वाढेल, स्वच्छता राहिल, लहान मोठ्या थोरांना या प्रार्थना स्थळेचा उपभोग घेता येईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व स्थानिक नगरसेवक व बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांनी प्रभाग क्र.13 मधील प्रार्थनास्थळाचे सुशोभिकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे मन:पूर्वक आभार. -जमीर इनामदार, बारामती