बारामती(वार्ताहर): अनेकांचा विचार केला असता, बारामती येथील नामांकित सोसायटीत महिला धोरण-2014 चा भंग होत असल्याचे दिसत आहे.
सन 1994 साली त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढाकाराने महिला धोरण तयार करण्यात आले. अशा प्रकारचे धोरण बनविणारे अग्रेसर राज्य अशी महाराष्ट्राची ओळख त्यातून निर्माण झाली. त्याच महाराष्ट्रातील साहेबांच्या गावातील बारामतीत एका नामांकित शैक्षणिक सोसायटीत संचालक मंडळात महिलांना स्थान नाही. संचालक मंडळ तर सोडा सभासदांमध्ये सुद्धा महिला स्थान नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
महाराष्ट्राने महिलांना नोकरी व उच्च शिक्षणात 30 टक्के, राजकीय क्षेत्रात/स्थानिक स्वराज्य संस्थेत 33 टक्के होते पुढे राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक संस्थामध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण करण्यात आले. हे सर्व महिलांच्या सर्वांगिण सक्षमीकरणा करीता करण्यात आले होते. तरी सुद्धा ही सोसायटी महिलांना दुय्यम स्थान देत असल्याचे दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे महिला आहेत. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे महिला आहेत. पं.स., जि.प., किंवा इतर संस्था, पतसंस्था, सोसायटीमध्ये महिला प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्र सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या अनेकांचा विचार न करणारी सोसायटी महिलांना दुय्यम स्थान देत आहे.
या सोसायटीसाठी देशाचे भाग्यविधाते खा. शरदचंद्रजी पवार साहेबांनी जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून केंेद्रातून, राज्यातून निधी स्वरूपात मदत केली. त्याच सोसायटीने साहेबांनी केलेल्या महिला धोरणाचा भंग केला ही खूप मोठी खेदाची बाब आहे.