अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): आय.एम.डी.कामगार समन्वय संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कामगार सेल व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वालचंदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष व कामगार नेते शिवाजीराव खटकाळे(भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी सायं.5 वा. आय.एम.डी.कामगार समन्वय संघ कार्यालयासमोर, बँक ऑफ इंडिया शेजारी, मेन कॉलनी, वालचंदनगर, ता.इंदापूर याठिकाणी होणार असल्याचे आय.एम.डी. कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जि.प.सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर तालुका युवकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्या उपस्थित संपन्न होणार असल्याचे आय.एम.डी.कामगार समन्वय संघाचे जनरल सेक्रेटरी प्रविण बल्लाळ यांनी सांगितले आहे.