अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): स्वच्छता व पर्यावरण तज्ञ तसेच जिल्हा नियोजन समिती ग्रामपंचायत व तालुकास्तरीय समित्या यांच्यात समन्वय साधण्यासाठी तालुकास्तरीय अध्यक्षपदी महेंद्र रेडके यांची निवड झाल्याबद्दल तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इंदापूर पंचायत समिती येथे पंचायत समिती सदस्य प्रदीप मामा जगदाळे यांच्या शुभहस्ते व सभापती सौ.स्वातीताई शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र रेडके यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
यावेळेस तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की, इंदापूरमध्ये तळागाळातील माणसाला गोरगरिबाला विद्यार्थ्यांना व कष्टकर्यांना काही अडचण आली तर समोर एकच नाव येते ते म्हणजे महेंद्र रेडके होय. यांची या समितीच्या अध्यक्षपदी अतिशय योग्य असा माणूस शासनाने निवडला. महेंद्रदादा सकाळी अकरा वाजता पंचायत समिती ऑफिसला येतात ते सहा ते सात वाजता जातात. त्यामुळे सर्वस्तरातील नागरीकांचे काम मार्गी लावण्यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करतात. महेंद्र रेडके यांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस इंदापूर पंचायत समितीचे सदस्य श्री.काळे, तेजपृथ्वी ग्रुपचे गणेश शिंगाडे, प्रसाद पाध्ये, दुर्योधन पाटील, हनुमंत यमगर व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.