अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यात 100 कोटी पेक्षा जास्त विकास कामे मंजूर होऊन चौफेर विकास करण्याचा दृष्टीकोन असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना व्यक्त केले.
ग्रामपंचायत कौठळी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी राज्यमंत्री भरणे बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्यध्यक्ष अतुल झगडे, प्रताप पाटील, सागर मिसाळ, सतिश पांढरे, यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे भरणे म्हणाले की, मी गेल्या सात वर्षापासून इंदापूर तालुक्याचा विकास केला असून इंदापूर तालुक्याचा विकास करणे हा येड्या गबाळ्याचे काम नाही असा खोचक सवाल विरोधकांना केला आहे. इंदापूर तालुक्यात सर्व रस्त्यांची कामे केली. पद हे मिरवायचे नसते तर सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी असते तसेच इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, दलित, मागासवर्गीय, सर्वसामान्य जनतेने मला भरघोस मतदान करून निवडून दिले त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे मी या गावचा विकास मोठ्या प्रमाणात केल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
पाण्याच्या प्रश्नाबाबत बोलताना भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात पाण्याचे काय करायचे व पाणी कसे आणायचे हे मी बघतो. गेल्यावेळी पाण्याबाबत इंदापूरच्या काही मंडळींनी सोलापूर वाल्यांचा गैरसमज केला असा आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला. आता फक्त काम राहिले आहे शेतीच्या पाण्याचे ज्यावेळी खडकवासल्याचे पाणी माझ्या शेतकर्याच्या शेतात बाराही महिने राहील तेव्हा मला व्यवस्थित झोप येईल. माझ्या शेतकर्याच्या शेतीच्या पाण्यासाठी भविष्यात जे काही करता येईल ते करण्याचे काम मी करणार आहे असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
इंदापूर तालुक्यातील व्यक्ती मुंबई मध्ये वैद्यकीय उपचार घेत आहे. तसे पुण्यामध्ये ही गरीब कुटुंबातील अनेक लोक उपचार घेत आहेत. त्या सर्व लोकांना व्यवस्थित औषध उपचार मिळण्यासाठी मी मोठ्याप्रमाणात काम केले आहे. मी शासनाच्या वतीने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून काही मदत करता येईल तेवढी करण्याचे काम केले आहे असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.