कायदेशीर मदत करणाऱ्या तीन वकिलांचे आग विझवण्यामध्ये नाव…

बारामती(प्रतिनिधी)ः वकील म्हटलं की, कायदेशीर बाबींचा नागरिकांना सल्ला देणारे न्यायालयात प्रतिनिधीत्व करणारे कायदेशीररीत्या भांडून पक्षकाराला न्याय मिळवून देणारे वकील असतात. वकीलांची कायदेशीर मदत होते असे म्हणतात पण आज प्रत्यक्षात आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक जान व भान जपत वकीलांचे आग विझवण्यामध्ये नावाची नोंद झाली.

14 मार्च रोजी बारामती कोर्ट परिसरात अचानक आग लागल्याची ॲड.अक्षय गायकवाड यांना त्यांच्या मित्राचा फोन आला. क्षणाचाही विचार न करता ॲड.अक्षय गायकवाड यांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन वाहन सातव चौकात आलेनंतर त्यांच्यासोबत वाहतुक अडथळा दूर करीत ॲड.गायकवाड घटनास्थळी पोहोचले.

तत्पूर्वी बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड.प्रसाद खारतुडे उड्डाण पुलाखाली होते. ॲड.खारतुडे, ॲड.गायकवाड आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याची प्रक्रीया सुरू केली. या वकीलांची जी संवेदनशिलता पहावयास मिळाली.

एवढंच नव्हे तर या दोन्ही वकीलांनी भिंतीवर चढून आग कुठे आहे ते दाखविण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या लोकांना दाखवत होते. विशेष म्हणजे याठिकाणी विजेचा खांब होता, या खांबाजवळ आग लागल्याचे दिसताच ॲड.गायकवाड यांनी प्रथमतः पाणी इथे मारा, अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते असे सांगताच अग्निशमन दलाच्या लोकांनी तेथील आग विझवली.

दररोज पांढरे शुभ्र कपडे घालून न्यायालयात प्रतिनिधीत्व करणारे वकील आज या घटनेत व गोंधळात पूर्णपणे भिजले होते. तीव्र आगीच्या झळा अंगावर सोसल्या, या सर्व बाबींपेक्षा आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या लोकांनी केले याचे खूप कौतुक वाटते.

या सर्व गोंधळा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर सेवादलाचे अध्यक्ष ॲड.धीरज लालबिगे याठिकाणी होते. त्यांनी आग कुठे जास्त आहे याबाबत सांगत खारीचा वाटा उचलला. कोर्टाच्या आत अग्निशमन दलाची गाडी यावी म्हणून त्यांनी स्वतः गाड्या काढून जागा करून दिली.

या तिन्ही वकीलांनी आग विझवण्यामध्ये जे काही प्रयत्न केले ते खूप अभिमानास्पद आहे. मे.कोर्टातील कर्मचारी सुद्धा यावेळी तणावात होते. त्यांनी सुद्धा आग विझविण्यामध्ये खारीचा वाटा उचलला.

वकील सुद्धा माणूसच आहे. वकील कायदेशीर मदतच नव्हे तर सामाजिक व अडचणीच्या ठिकाणी सुद्धा दोन हात करीत सामाजिक जान व भान जपीत मदत करतात हे तितकेच खरे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!