बारामतीच्या टी.सी. महाविद्यालयाचा क्विक हील फाउंडेशनकडून राज्यस्तरीय गौरव

बारामती: येथील तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर क्लबने आपल्या उल्लेखनीय कार्याच्या जोरावर “Best New Club Winner” हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, क्लबचे सचिव संदीप माने या विद्यार्थ्याला “Best Secretary Winner” या विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. हा पुरस्कार क्विक हील फाउंडेशन तर्फे आयोजित “Cyber Shiksha for Cyber Suraksha 2026” या उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आला.

सायबर जनजागृती क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केल्याबद्दल सायबर वॉरियर क्लबला हा बहुमान मिळाला आहे. क्लबने आतापर्यंत बारामती परिसरातील २५,००० पेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचून सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती केली आहे.

या उपक्रमांतर्गत बारामतीतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. तसेच बचत गट, दूध संघ, इस्कॉन मंदिर, स्थानिक व्यावसायिक संस्था आणि कृषी उद्योग संघ यांसारख्या विविध घटकांपर्यंत पोहोचून सायबर जागरूकतेचे उपक्रम राबविण्यात आले.

याशिवाय बस स्थानक, रेल्वे स्थानक, पंचायत समिती तसेच स्वामी समर्थ मंदिर परिसरात व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. विशेष म्हणजे, सायबर फसवणुकीवर आधारित पथनाट्य सादर करून नागरिकांना सायबर धोके अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी सांगितले की, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा यशाचा मान मिळाला असून, ही कामगिरी इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सदर पुरस्कारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य, अधिष्ठाता, उपक्रम समन्वयक प्रा. सलमा शेख, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उपक्रमात क्लबचे अध्यक्ष अभय साहू, सचिव संदीप माने, गतिविधी संचालक ज्योती गुरव, मीडिया संचालक सायली ढगे तसेच सायबर वॉरियर्स बाळकृष्ण शिंदे, वृषाली जानभरे, माधवी कांबळे, गायत्री केंद्रे, शर्वरी बाचल, प्रीती कापसे, निकिता पोमणे, दिशा जाडकर, दीप्ती गार्दी, सलोनी शेख, योगिता माने, वरद साळवे, रोहन लोखंडे, प्रणव भोसले, सिद्धार्थ काळे आणि यश झिंजाडे यांचा सक्रिय सहभाग होता.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा हा यशस्वी प्रवास सामाजिक बांधिलकी आणि डिजिटल सुरक्षिततेबाबतची सजगता यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!