भिगवण(प्रतिनिधी-हेमंत भोसले): येथील जिल्हा परिषद शाळा तक्रारवाडी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सचिनभैय्या आढाव मित्र परिवारातर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शरयू क्रीडा फाउंडेशन खजिनदार सचिन आढाव, अध्यक्ष वैभव आढाव, उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब भोसले, उमेश आढाव, श्रीनिवास शेलार, कुणाल आढाव, संदीप आढाव, संजय खाडे, भाऊसाहेब वाघ, नामदेव खंडाळे, संगीता आढाव, पूजा आढाव, अर्चना कांबळे, उजनी एक्सप्रेसचे संपादक अमोल कांबळे व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे स्वाभिमान जागृत होतो, शिक्षणवंचित आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कारण शिक्षण हेच शोषणातून मुक्तीचे माध्यम आहे. स्त्रियांनी सुशिक्षित व्हावे आणि आपल्या हक्कांसाठी लढावे, शिक्षणासोबतच शील (चरित्र) महत्त्वाचे आहे. चारित्र्याशिवाय शिक्षण हे निर्बुद्ध मानले गेले आहे. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि स्वतंत्र विचारसरणीचे बनावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. असे अमूल्य विचार डॉ.बाबासाहेबांनी मांडले होते.
या अमूल्य विचारांवर सचिनभैय्या आढाव मित्र परिवाराने विधायक उपक्रमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.