मुंबईः राज्याचे नेते, महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 22, 25 आणि 26 जुलै 2026 या तीन दिवसांपैकी एका दिवशी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” या जनहितकारी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आदरणीय अजितदादांनी सदैव जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि लोककल्याणाची भूमिका जपली. त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागासह विविध शासकीय सेवा, दाखले, प्रमाणपत्रे तसंच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. एकही पात्र नागरिक या सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचना दिल्या.
“शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि कुटुंबापर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून हे अभियान लोकाभिमुख आणि यशस्वी करण्याचं आवाहन केलं.
याचवेळी ‘SIR’ (Special Intensive Revision) अभियानासंदर्भातही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करणं, बीएलए स्तरावरील काम प्रभावीपणे राबवणं, घराघरात पोहोचून मतदारांना सहकार्य करणं आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन केलं.
जनसेवा आणि संघटन बळकटीकरणाच्या या दोन्ही महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयानं व पूर्ण क्षमतेनं सहभाग घ्यावा, अशा सूचना दिल्या.