बारामती(प्रतिनिधी): 201 बारामती विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसना आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट, रयत क्रांती संघटना, भीमशक्ती रिपब्लिकन सेना या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्यांक समाज बांधवांची घोंगडी बैठकीचे आयोजन आज शनिवार दि.18 एप्रिल 2026 रोजी सायं.7 वा. एकता महिला नागरि सहकारी पतसंस्था, गुनवडी रोड, बारामती याठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याचे एकता ग्रुप बारामती व नगरसेवक आलताफ सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या बैठकीसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.हसन मुश्रीफ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे लतीफ तांबोळी, बारामती नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर अध्यक्ष किरण इंगळे हे उपस्थित राहणार आहेत.
तरी जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाज बांधवांनी वेळेवर नचूकता उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.