तुळजाराम चतुरचंद  महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाचा  शुभारंभ

बारामती :तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे दिनांक ११ जुलै २०२६ रोजी प्रेरणा सभागृहात  क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमाचा उद्घाटन व प्रशिक्षण कार्यक्रम  उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी जागरूकता, सुरक्षित डिजिटल वापराच्या पद्धती तसेच समाजामध्ये जनजागृती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नव्याने निवड करण्यात आलेल्या सायबर वॉरियर्सचे प्रशिक्षण क्लब अधिकाऱ्यांकडून क्विक हील फाउंडेशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर वॉरियर बॅचेस वितरित करण्यात आल्या. नव्याने निवड झालेल्या  सायबर वॉरियर्स व क्लब अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना सायबर जनजागृतीसाठी सक्रियपणे कार्य  करण्याचे आवाहन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभागघेण्याची प्रेरणा मिळाली. उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. अरुण मगर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष   म्हणून उपस्थित राहून आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले व महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

एकूणच हा उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून सायबर जनजागृतीच्या दिशेने आणखी एका प्रभावी वर्षाची  सुरवात झाली.

या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ.सलमा शेख यांनी अश्विनी भोसले, तृप्ती भोसले, आसावरी  कांबळे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्योती गुरव हिने व आभार शिवरत्न गायकवाड याने केले.

संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) व सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!