लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त एकता ग्रुपतर्फे पाच विधायक उपक्रमांचे आयोजन

बारामती(प्रतिनिधी): लोकनेते अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त 21 जुलै रोजी अक्षता मंगल कार्यालय, सातव हायस्कूल समोर, जगताप मळा बारामती याठिकाणी एकता ग्रुपतर्फे पाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे एकता ग्रुपचे अध्यक्ष तथा नगरसेवक आलताफ सय्यद यांनी कळविले आहे.

प्रथमतः सकाळी 10 वा. ग्रामदैवत हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्ग्याला चादर अर्पण करण्यात येणार आहे. 11 वा. अक्षता मंगल कार्यालयात कै.धो.आ.सातव (कारभारी अण्णा) हायस्कुल येथील गरजू 300 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग क्र.17 मधील अष्टविनायक तरूण मंडळास (35 पायऱ्या) माईक, स्पीकर व मशीन सप्रेम भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. याचठिकाणी बारामती शरातील 50 छोट्या व्यावसायिकांना दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अ वर्ग सभासद नोंदणी व शेअर्स प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. एकता सहकारी गृहनिर्माण संस्था, मेडद याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम बारामती नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते व दि मुस्लीम को-ऑप बँकेचे चेअरमन तनवीर पी.ए.इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरचे अध्यक्ष किरण इंगळे, बारामती बँकेचे चेअरमन शिरीष कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, बा.न.प.चे गटनेते संजय संघवी, उपनगराध्यक्षा सौ.श्वेता नाळे, धों.आ.सातव कारभारी हायस्कूलचे अध्यक्ष दत्तात्रय सातव, बा.न.प. शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, मुस्लीम बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲड.अय्युब शेख, बारामती बँकेचे संचालक प्रितम पहाडे या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!