कल्याण ज्वेलर्सच्या बारामतीतील पहिल्या शोरूमचे उदघाटन संपन्न: ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता टिकवण्यास कटिबद्ध

बारामती(प्रतिनिधी): बारामतीतील नवीन कल्याण ज्वेलर्स शोरुमचे शानदार उदघाटन लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री श्रीमती तबू यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या बरोबर कल्याण ज्वेलर्सच्या लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रेड, केनडियरच्या शोरुमचे देखील उदघाटन यावेळी करण्यात आले.

यावेळी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमण यांनी अभिनेत्री श्रीमती तबू यांचे स्वागत केले. यावेळी कल्याण ज्वेलर्सचे ग्राहक आणि चाहते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीमती तबू मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, बारामतीमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या अप्रतिम पहिल्या शोरुमचे उदघाटन करताना मला खूप आनंद होत आहे. कल्याण ज्वेलर्स हा ब्रेड विश्वास, पारदर्शकता आणि भारतीय वारसावर उभा आहे.
या शोरूममुळे स्थानिकांना सोने, हिऱ्यांचे दागिने आणि वधू-वरांसाठी खास आकर्षक संग्रहामुळे ग्राहक जास्तीत जास्त दागिने खरेदी करतील यात शंका नाही. भारतातील एक सर्वात विश्वसनीय ज्वेलरी ब्रेड, कल्याण ज्वेलर्सने बारामतीमध्ये आपले पहिले शोरूम सुरु करून, महाराष्ट्रातील रिटेल विस्ताराच्या घोडदौडीत एक लक्षणीय टप्पा गाठला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रमेश कल्याणरमण मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बारामतीमध्ये आमचे पहिले शोरूम सुरु करून महाराष्ट्रामध्ये आमचे स्थान अधिक मजबूत झाले याचा आनंद होत आहे. सदाबहार कलाकुसर, आधुनिक डिझाईन्स आणि दागिने खरेदीचा अतुलनीय अनुभव हे सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कल्याण ज्वेलर्सने विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता टिकवत ग्राहकांची मने जिंकलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण ज्वेलर्स आणि केनडियर शोरुम्स ग्राहकांसाठी दागिन्यांच्या सर्वसमावेशक खरेदीचे ठिकाण ठरेल. कल्याण ज्वेलर्सचे मूलभूत मूल्यांचे पालन करून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सर्वोतम दागिने, प्रमाणित कारीगरी आणि अतुलनीय सेवा मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले.

कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा बीआयएस हॉलमार्क असतो. शुद्धतेच्या अनेक काटेकोर चाचण्या यशस्वीपणे पार केल्यानंतरच दागिना विक्रीसाठी उपलब्ध केला जातो. याव्यतिरिक्त, ग्राहकांना दागिन्यांसोबत ब्रेडचे सिग्नेचर 4-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र मिळते. जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल, उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि उत्पादने कायम मिळावीत याप्रती ब्रँडची बांधिलकी यामधून अधोरेखित होते.

शुभमूहर्तावर ग्राहकांसाठी लाभ:-
या नव्याने सुरू झालेल्या कल्याण ज्वेलर्स शोरूमच्या शुभमूहूर्तावर ग्राहकांना 1 लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक खरेदीसोबत, खरेदी किमतीच्या 50% पर्यंतच्या दागिन्यांवर 0% घडणावळ शुल्काचा लाभ घेता येईल. तसेच, ग्राहकांना जुने सोने बदलून घेताना 0% कपातीचा (डिडक्शन) लाभ घेऊ शकतात, सोबतच जुन्या सोन्याच्या बदल्यात त्वरित रोख रक्कमही मिळवू शकणार आहे.

काय…काय…आहे शोरूममध्ये:-
या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय हाऊस ब्रँड्स देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूरत (लग्नाचे दागिने), मुद्रा (हाताने पडवलेले ॲटिक दागिने), निमाह (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्याऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्याऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्?यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्याऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.

केनडियर ब्रँडमध्ये काय..काय आहे…
केनडियर हा ब्रँड ट्रेंडी दागिने व आधुनिक डिझाईन्ससाठी नावाजला जातो. केनडियरचे दागिने कमी वजनाचे असतात, त्यामुळे आजची जेन झी पिढी, नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला, इतकेच नव्हे तर स्टाईल-सॅव्ही पुरुषांना देखील ते खूप आपलेसे वाटतात. यांच्या किमती फक्त 10,000 रुपयांपासून सुरु होत असल्याने, कायम आठवणीत राहील अशी शानदार भेट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहेत. ऑनलाईन खरेदी करता येईल असा ब्रँड म्हणून सुरुवात करून ते आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध असणारा ब्रँड बनण्यापर्यंतचा प्रवास करताना, केनडियरने ऑनलाईन खरेदीतील सहजता आणि प्रत्यक्ष दुकानात जाऊन दागिने हाताळून पाहण्याचा अनुभव यांचा सुरेख संगम घडवून आणण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

आलिशान वातावरण आणि कल्याण ज्वेलर्सच्या एकापेक्षा एक सरस कलेक्शन्समधील अनेक विविध दागिने यांच्यासह हे नवीन शोरूम आपल्या पारखी ग्राहकांना खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करण्यासाठी सज्ज आहे.

ब्रेड, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी कृपया https://www.kalyanjewellers.net/ येथे संपर्क साधावा. (निमय व अटी लागू)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!