नगराध्यक्षांच्या भागात सर्वात प्रथम विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीमेचे 100% काम पूर्ण: निलम काशिद यांचे कौतुक व सत्कार!

बारामती(प्रतिनिधी): 201 बारामती विधानसभा मतदार संघातील बा.न.प.चे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या भागात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीमेची सर्वात प्रथम 100% काम त्रुटीमुक्त आणि अचूक पूर्ण तयार केल्याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) सौ.निलम काशिद यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

काशिद यांचेकडे भाग क्र.123 होता. यामध्ये एकूण 1 हजार 13 मतदार होते. यापैकी 854 मतदारांचे डिजीटल स्वरूपात रूपांतर केले तर 159 मतदार नोंदणीकृत पत्त्यावर सापडले नाही. या भागात बारामती शहरातील सुतारनेट, मुंजाबा देऊळ, सातवगल्ली, ढवाणगल्ली यांचा समावेश होता.

या भागात पर्यवेक्षक एस.पी.पिसे तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून योगिता दरेकर यांनी काम पाहिले. या भागात नगराध्यक्ष सचिन सातव, माजी नगरसेवक सुरज सातव, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत ढवाण व प्रतिक ढवाण यांनी एसआयआरचे कामकाज पूर्ण करण्यासाठी मोलाची मदत केली.

काशिद या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत धावपळ करीत मुदतीपूर्वीच डिजिटल नोंदणीचे आव्हान पूर्ण केल्याने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी पंकज भुसे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपमुख्याधिकारी योगिता दरेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदार पडताळणी आणि डिजिटायझेशनचे आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्हातील विशेषतः बारामती तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करीत काम केले व करीत आहेत.

सौ.निलम काशिद आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या की, क्लिष्ट आणि महत्त्वाचे काम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाचे भक्कम असे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्निल रावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उपमुख्याधिकारी सौ.योगिता दरेकर आणि पर्यवेक्षक एस.पी.पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेला आढावा, तांत्रिक अडचणींवर केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सौ.निलम काशिद यांनी 100% एसआयआरचे उद्दिष्ट मुदतीपूर्वी गाठणे शक्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!