पुणे(प्रतिनिधी): लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रविवार दि.9 ऑगस्ट रोजी दु.2 ते सायं.6 वाजेपर्यंत न्यू डॉन हायस्कूल हॉल, ब्रह्मा इस्टेट शेजारी, ज्योती चौका जवळ, कोंढवा पुणे याठिकाणी वधु-वर सूचन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलअसल्याचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक व सौजन्य राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष व मुस्लीम बँकेचे संचालक व पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲड.अय्युब शेख यांनी कळविले आहे.
ॲड.अय्युब शेख विचार मंच आणि टॉप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वधु व वर यांना समोरासमोर उभे करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विधवा, सोडचिठ्ठी, वयोवृद्ध व उच्चशिक्षिताना यामध्ये सहभाग घेता येणार आहे.
या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधु व वरांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून, सदरचा मेळावा मोफत घेण्यात आलेला असल्याचे टॉप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शकील शेख यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन टॉप फाऊंडेशनचे पुणे शहर अध्यक्ष फैसल रिश्तेवाला यांनी केले आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून एमव्हीएस न्यूजच्या मुख्य संपादिका कमरून्निस्सा शेख हे उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी फैसल रिश्तेवाला मो.नं.7875202786, यास्मिन शेख मो.नं.7219230450, रूक्साना इनामदार मो.नं.9767791656 यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.