गावठी पिस्टल जवळ बाळगुन दहशत करणारा आरोपी जेरबंद: भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी

भिगवण (प्रतिनिधीः हेमंत भोसले): गावठी पिस्टल जवळ बाळगून दहशत निर्माण करणारा सौरभ मारूती पवार (वय-28 वर्षे, रा.म्हसोबाचीवाडी, ता.इंदापूर) यास भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तयार केलेल्या टिमने शोध घेऊन आरोपीस जेरबंद केले.

युवराज प्रतापराव भोसले (रा.निरगुडे, ता.इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सौरभ पवार याच्यावर भिगवण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.198/2026, भारतीय न्याय संहीता सन.2023 चे कलम. 351(2), 352, भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम. 3 (25) प्रमाणे 8 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

7 ऑगस्ट रोजी दु.3 वा. फिर्यादीस आरोपीने तु येथे थांबायचे नाही. तु येथुन निघुन जा, असे म्हणुन तु लईच बोलतुस असे म्हणुन शिवीगाळ करून तुला व तुझ्या कशर मालकाला गोळयाच घालतो अशी धमकी दिली.

सदरचा गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन, भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तात्काळ तपासाकामी एक टिम तयार करून आरोपीचा शोध घेणेकामी मार्गदर्शन व सूचना दिल्या. 10 ऑगस्ट 2026 रोजी सदरचा आरोपी सौरभ पवार मिळुन आला. खाकी दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा करण्यासाठी वापरलेला गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) तसेच एक जिवंत काडतुस व गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्कॉपीओ गाडी नंबर. एम.एच.12/ई.एम. 9488, असा एकुण 5,40,200/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यास मे.कोर्टात हजर केले असता 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि. प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विठठ्ल वारगड, पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, रणजित मुळीक, यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सोमनाथ शेंडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!