बारामतीः शहर व तालुका हद्दीत गेली 15 दिवसांपासून बुलेट चोरीचे वाढते प्रमाण पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलीस स्टेशनने केलेल्या संयुक्तीक कारवाईमध्ये तब्बल 30 लाख रूपयांचा मुद्देमाल, 19 मोटार सायकल वाहने हस्तगत करून 19 गुन्हे उघडकीस करण्यात यश प्राप्त झाले आहे.
स्थानिक गुन्हे शोध पथकात व बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व गुन्हेगाराला ओळखणारे करडी नजर असणारे अनुभवी पोलीस कर्मचारी पोलीस आहेत.
स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार या दोघांनी दोन पथके तयार करून रात्रगस्त, पेट्रोलिंग करणे, संशयीत वाहने व आरोपी तपासणे यामधून सराईत बुलेट चोरांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
सदर गस्त करीत असताना, संशयीत इसम चोरीची मोटार सायकल घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असलेबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने पोलीसांनी सापळा रचून सदर इसम पेन्सील चौकाकडून मेडिकल कॉलेजकडे जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. विचारपूस करता त्याने त्याचे नाव समाधान बाळू काळे (वय 23 वर्षे, रा.मानेवाडी ता. फलटण जि. सातारा) असे सांगितले. चौकशी अंती त्याने सांगितले की, एकटाच व्ही.आय.पी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटार सायकल रात्रीच्यावेळी चोरी करुन चोरी केलेल्या वाहनावर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एसटी महामंडळ असे लोगो लावुन चोरी केलेल्या मोटार सायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याची कबुली दिली आहे.
त्यास सदर गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचेकडुन खालील प्रमाणे 13 बुलेट मोटार सायकल व इतर 6 मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
१) MH ४२ BK ३००३, २) MH ४२ AV २१२१, ३) MH ४२ BK ०७४९, ४)MH ४२ BK ९७०९, ५) MH ४२ BD ९४९०, ६) MH ४२ AT ५४५५, ७) MH ४२ AZ ०३७४, ८) MH ४२ AZ १६१६, ९) MH ४२ AB १२१२, १०) MH ४२ TG २६७७, ११) MH ४२ AV ७८६९, १२) MH ४२ UQ ०३०३, १३) MH ४२ EA ९९७७, व 6 इतर असा आरोपीकडून सुमारे 30 लाख रूपये किंमतीच्या 13 बुलेट व 6 इतर मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ई बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलाणी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे, यांनी केली आहे.
आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.