साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

भिगवण(प्रतिनिधीः हेमंत भोसले) : ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, गोर-गरीब, कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे असा संदेश देणारे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती तक्रारवाडी(भिगवण) याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

13 ऑगस्ट रोजी सायं.5 वा. प्रथमतः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंसह सर्व महापुरूषांना पुष्पहार अर्पण करून जयंती मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी पुणे जि.प.सदस्या सौ.मेघनाताई बंडगर, इंदापूर पं.स.सदस्या सौ.हेमाताई माडगे, तक्रारवाडी गावचे सरपंच शरद वाघ, नितीन काळंगे, सतीश वाघ, संजय मोरे, प्रविण वाघ, मदनवाडी गावचे सरपंच नानासाहेब बंडगर, यशवंत वाघ, गौरव वाघ, कुंडलिक बंडगर, तेजेस देवकाते, राजू गाडे पाटील, गणेश वायदंडे, रामभाऊ कांबळे, संपत बंडगर, दिनेश मारणे, शहाजी बंडगर, अमितकुमार वाघ, राहुल गाडे, नंदू लाळगे, अक्षय ताटे  इ. मान्यवर उपस्थित होते

जयंती मिरवणुकीचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान तक्रारवाडीचे मंडळाचे अध्यक्ष सचिन खंडाळे, नवभाऊ पाटोळे इ. केले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!