नागरिकांनी मोबाईल चोरांवर व्यक्त केला क्रोध! भिगवण पोलीसांनी विशेष प्रकल्पाद्वारे घेतला, गहाळ झालेल्या मोबाईचा शोध!!

बारामती(प्रतिनिधीः हेमंत भोसले): भारत सरकारचा विशेष प्रकल्प सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) दूरसंचार विभाग चालवीत आहे. या प्रकल्पाद्वारे देशातील हरविलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक, ट्रॅक आणि रिकव्हर केले जातात. या प्रकल्पाद्वारे (पोर्टल) भिगवण पोलीस स्टेशनने तब्बल 2 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दमदार कामगिरी केल्याने नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

नागरिकांच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांबरोबर मोबाईल ही महत्वाची गरज होऊन बसली आहे. मोबाईल म्हणजे जीव की प्राण, असा प्राण असलेला मोबाईल चोरांनी चोरल्यावर त्याबाबत जो त्यांच्याकडून क्रोध व्यक्त केला जातो तो असह्य आहे. भिगवण पोलीसांनी नागरिकांनी व्यक्त केलेला क्रोध कमी करण्यासाठी दक्ष राहुन जी कामगिरी केली त्यामुळे भिगवण परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत सन.2025-2026 या कालावधीत शेतकरी, व्यापारी, नोकरदार इ. मोबाईल गहाळ झाले होते. या लोकांना त्यांचे मोबाईल मिळावेत या हेतूने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार तुषार रायकर यांना मार्गदर्शन करून गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती संकलीत करून शोध घेणेबाबत सूचना दिल्या.

त्यानुसार तुषार रायकर यांनी तातडीने सीईआयआर या पोर्टलचे मदतीने एकुण 10 मोबाईलचा अंदाजे किंमत 2 लाख 50 हजार रूपयांचा शोध घेवुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालक यांना परत देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार तुषार रायकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!