वडगांव निंबाळकर(प्रतिनिधी): जबरी चोरी करणारे सराईत 4 गुन्हेगारांना अटक करून त्यांचेकडून 2 मोटार सायकल, चोरीतील सोन्याचे दागिणे असा तब्बल 11 लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला यश आले आहे. पोलीसांच्या कौतुकास्पद कारवाईचे स्वागत नागरिकांमध्ये होत आहे.
6 ऑगस्ट रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे कानाडवाडी रस्त्यालगत शेतात काम करणारी महिला नामे स्वाती हनुमंत टकले (वय-32 वर्षे, रा.कानाडवाडी, ता.बारामती) हीस मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात तीन चोरांनी गळ्याला जखम करून गळ्यातील मनी व डोरले असे 6 ग्रॅम वजनाचे दागिणे जबरीने हिसकावून नेला. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासाकामी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहिती तसेच सीसीसीटीव्हीची पाहणीच्या आधारे या गुन्ह्यातील संशयीत आरोपी (1) राज मिथुन शिंदे (रा.राजाळे ता.फलटण जि.सातारा (2) सनी रमण भोसले (रा.राजक्रुम बंगला, सांगवी ता. फलटण जि. सातारा) (3) पवन सॅन्डल काळे (रा. मांगोबामाळ, विडणी) हे तिघेही फलटण तालुक्यातील आहेत. या संशयीतांना खाकी व चौकशी केली असता, या तिघांनी सदरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता यवत, जेजरी, बारामती शहर, वालचंदनगर, पोलीस स्टेशन हद्यीतील लोंणद, फलटण शहर पोलीस स्टेशन या भागात जबरी चोरी चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन झाले आहे. वरील तिघांनी स्वाती टकले यांचे चोरलेले दागिणे बापुराव भानुदास चोपडे (रा.राजाळे ता.फलटण जि.सातारा) यांना दिले. सदरचे दागिणे चोपडे यांनी प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक (रा.मारवाडपेठ, ता. फलटण जि. सातारा) यास विक्री केल्याने निष्पन्न झाले. वरील 5 पैकी 4 जणांना अटक करून त्यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला असून जबरी चोरीचे 10 गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे. या आरोपी पैकी पवन काळे फरार आहे.
1) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. 154/2026 बी.एन.एस कलम 309(4),309(6),317(4),3(5) 2) जेजुरी पो.स्टे. गु.र.नं. 243/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 3) जेजुरी पो.स्टे. गु.र.नं. 144/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 4) वालचंदनगर पो.स्टे. गु.र.नं. 243/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 5) यवत पो.स्टे. गु.र.नं. 843/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 6) बारामती षहर पो.स्टे. गु.र.नं. 333/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 7) फलटण षहर पो.स्टे गु.र.नं. 168/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 8) फलटण षहर पो.स्टे गु.र.नं. 304/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 9) लोंणद पो.स्टे गु.र.नं. 360/2026 बी.एन.एस कलम 304(2),3(5), 10) लोंणद पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालार पोपट नाळे, अनिल खेडकर,आबा जाधव, नरेद्र यादव, धनंजय भोसले, ह्नदयनाथ देवकर, सुरज धोत्रे, भाउसाहेब मारकडयांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक जीवन मोहिते करीत आहेत.