बारामती(प्रतिनिधी): इस्लाम धर्म आणि ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या शिकवणीनुसार इतरांना जेवण देणे हे अत्यंत पुण्यकारक, महत्वाचे व श्रेष्ठ मानले आहे. ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांनी त्यांच्या कृतीतून आणि वचनातून सतत याबाबत संदेश दिलेला आहे.
याचाच एक भाग म्हणून एकता ग्रुप बारामती व नगरसेवक, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांच्या संयुक्त विद्यमानाने ह.मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.26 ऑगस्ट 2026 रोजी रात्रौ.8 ते 10 वाजेपर्यंत एकता नागरी सह. पतसंस्था, गुनवडी रोड बारामती याठिकाणी स्नेहभोजन व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे चौथे वर्ष आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहाने ह.मोहम्मद पैगंबर(स.) यांची जयंती एकता ग्रुपतर्फे साजरी केली जाते. याहीवर्षी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात असल्याचे एकता ग्रुपतर्फे कळविण्यात आले आहे.