बारामतीः एकता ग्रुप व आलताफ सय्यद मित्र परिवाराच्या वतीने डिजे, फ्लेक्स, अतिषबाजी इ. फाटा देत स्नेहभोजनाचे आयोजन करून इस्लाम धर्मशास्त्राच्या कृती व वचनाचे पालन केले. या कार्याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथमच यावर्षीपासून रक्तदान शिबीर सुरू करण्यात आले यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 142 युवकांनी रक्तदान करून श्रेष्ठदान केले.

या कार्यक्रमा दरम्यान बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, बारामती पं.स.सभापती किरण तावरे, बारामती बँकेचे चेअरमन शिरीष कुलकर्णी, महाराष्ट्र स्टीलचे उद्योजक जुजरशेठ कायमखानी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर, उपनगराध्यक्षा सौ.श्वेता नाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.किरण इंगळे, नगरसेवक निलेश इंगुले, बा.न.प.आरोग्य समितीचे सभापती नवनाथ बल्लाळ, बांधकाम समितीचे सभापती अमर धुमाळ, महिला व बालकल्याण विभागाचे सभापती सौ.सविता जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत घाडगे, नगरसेवक सोमनाथ गजाकस, राजेंद्र सोनवणे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, नगरसेविका सौ.संपदा चौधर, सौ.सारिका वाघमारे, प्रतिभा खरात, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, मेडदचे माजी सरपंच अजित कांबळे, उद्योजक अमोल वाघमारे, बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, सदस्य अलीअजगर नगरवाला, शिवसेनेचे शहराध्यक्ष शौकत बागवान, माळेगाव कारखान्याचे माजी संचालक दिलीप ढवाण, उद्योजक इरफान इनामदार, अत्तार-मणेर-पटवेकर-शकीलकर जमातीचे अध्यक्ष अहेमद शिकीलकर, हाजी गुलाबनबी कुरेशी, ॲड. करीमभाई बागवान, हाजी वसीम शब्बीर कुरेशी, हाजी महेबुब बागवान, निसार शेख, सेगा स्वीट होमचे इकबाल शेख, अबू शेख, हाजी नूरुद्दीन खाईमी, मकसूद खान, युसूफ शेख, कमाल इनामदार, हाजी युसुफ इनामदार, सिकंदर तांबोळी,जाकीर तांबोळी, हनीफ शेख, अस्लम पठाण, अलाउद्दीन सय्यद, जलाली अश्रफी ग्रुप के सलीम शेख, हमीद शेख तसेच बारामती शहरातील मुस्लिम समाजातील जवळपास सर्वच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सचिन सातव, किरण तावरे, ॲड.सुधीर पाटसकर यांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले. आलेल्या सर्व बांधवांचे स्वागत नगरसेवक मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद व एकता ग्रुपचे सर्व सदस्यांनी यांनी केले.