भारतीय टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार विमुक्त दिन सोहळा

बारामतीः भारतीय टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वा. भिगवण चौक, नगरपरिषदेसमोर बारामती याठिकाणी विमुक्त दिन सोहळा साजरा होणार आहे.

पुर्वा श्रमिच्या गुन्हेगार जमाती म्हणजेच 14 विमुक्त जमाती यामध्ये बेरड, बंजारा, भामटा, बेस्टर, कंजारभाट, कैकाडी, कटाबू, रामोशी, पालपारधी, राजपारधी, रजपूत भामटा, वडार, वाघरी, छप्परबंद यांना ब्रिटीश सरकारने 1871 च्या गुन्हेगारी जाती जमाती प्रतिबंध कायदाने जन्मजात गुन्हेगार जमाती म्हणून घोषित करून तारेच्या कुपनात बंधिस्त केले होते.

भारत देश स्वतंत्र झाला तरी हा कायदा अस्तित्वात होता पण 31 ऑगेस्ट 1952 साली भारत सरकाने हा कायदा रद्द करून या जमातींना विशेष मुक्त केले. तेंव्हापासून या जमाती 31 ऑगस्ट हा विमुक्त दिन म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.

महाराष्ट्र शासनाने नुकताच 31 जुलै 2025 रोजीचे शासन निर्णय नुसार स्वातंत्र चळवळीतील व राष्ट्र उभारणीतील विमुक्त जमातीच्या योगदानाचा आदर करून 31 ऑगस्ट हा दिवस “भटकेविमुक्त दिवस “ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी का होईना शासनाने या जमातीचे योगदानाची दखल घेतली आहे. त्यामुळे शासनाचे आभार मानने हे आपले कर्तव्य समजतो.

या समाजाचा झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सामाजिक प्रवाहात आणून सन्मानाने जगण्याची संधी देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

बारामती मध्ये भामटा सेटलमेंट येथे भामटा म्हणजेच टकारी समाजाचे वतीने दरवर्षी 31 ऑगस्ट 2026 हा विमुक्त दिन सोहळा साजरा केला जातो. विमुक्त दिन व शासनाचे आभार सोहळा यावर्षी आयोजित केला आहे.

तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन रामोशी समाजाचे प्रतिनिधी सदाशिव बोडरे, पारधी समाजाचे प्रतिनिधी बापू काळे, कैकाडी समाजाचे प्रतिनिधी वस्ताद पप्पू माने, वडार समाजाचे प्रतिनिधी उत्तम धोत्रे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!