अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील ग्रामपंचायत कौठळी येथे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रयमामा भरणे यांच्या शुभहस्ते आज शनिवार दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी सायं.5 वा. कौठळी ग्रामपंचायत कार्यालया समोर 14.22 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ आज मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर असुन, प्रमख पाहुणे म्हणून जि.प.आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने व विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. अशी माहिती कौठळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.नंदाताई चोरमले, उपसरपंच पै.सुनिल खामगळ व सर्व सदस्यांनी दिली आहे.

उद्घाटन :-
- ग्रामपंचायत कार्यालय
- गावठाण अंगणवाडी
- विठ्ठल-रूक्मिणी मंदीर सभामंडप
- संत गाडगेबाबा सभागृह
- भवानीमाता मंदीर सभामंडप
- स्मशानभूमी बांधकाम
- कानिफनाथ मंदीर सभामंडप
- 12 हायमास्ट दिवे,
- फॉरेस्ट माती बांध-22,
- कौठळी-कारखाना रस्ता डांबरीकरण
- व्याहळी ते कौठळी रस्ता डांबरीकरण
भूमिपूजन :-
- कौठळी-नि.के.रस्ता डांबरीकरण
- कौठळी-पोंदकुलवाडी रस्ता डांबरीकर
- माने-भंडलकरवस्ती अंगणवाडी बांधकाम
- 4 रस्ते कॉंक्रीटीकरण
- बौद्ध विहार
मंजूर कामे :-
- राष्ट्रीय पेयजल योजना-1 कोटी 64 लाख
- शालेय साहित्य-5 लाख
- व्यायामशाळा साहित्य-5 लाख