बारामती(वार्ताहर): देशी दारूचे बॉक्स व इंग्लिश दारूच्या काही कॉर्टर ग्रामीण भागांमध्ये विक्रीसाठी घेऊन चाललेली पांढर्या रंगाच्या रेनॉल्ट क्युट गाडी क्रमांक चक MH 42X4263 सह 5 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बारामती शहर पोलीस स्टेशनने जप्त केला.
गुप्त माहिती मिळालेनुसार वरील वाहन गुणवडी चौक या ठिकाणी अडवुन झडती घेतली असता, यामध्ये देशी दारुची सिमला ब्रँडचा एक बॉक्स व टँगो कंपनीच्या ब्रँडचा 180 ईमेलचा एक बॉक्स इंग्लिश दारूच्या 180 बॉक्स कंपनीच्या चार बोटल असा 13,200 रुपयाचा दारू साठा मिळून आला सदरची कार किंमत अंदाजे पाच लाख रुपये हे सुद्धा जप्त करण्यात आली. सागर भगवान भोसले (वय-29, रा. निरावागज) यांना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे पोलीस अंमलदार, तुषार चव्हाण, खांडेकर, दशरथ कोळेकर ,कोठे, दशरथ इंगोले, राऊत ,अतुल जाधव संजय जाधव ,यांनी केली आहे.