बारामतीः बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूकीत नामनिर्देशन पत्र दाखल करताना झालेल्या गोंधळामुळे, अपक्ष व पक्षाच्या काही उमेदवारांनी अनामत रक्कम भरूनही व वेळेत उपस्थित राहुनही त्यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करून घेतला नाही. यामध्ये प्रभाग क्र.13, 15 व 17 यांचा समावेश आहे.
सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही तेथे झालेल्या गोंधळामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित असताना उमेदवारांना घेण्यात आले नाही. या उमेदवारांनी मे.कोर्टात धाव घेतली आणि निवडणूक याचिका दाखल केली. मे.कोर्टाने यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल घेण्याचे आदेश केले. निवडणूक प्रक्रियेचा कालावधी संपुष्टात येणार होता आणि मे.कोर्टाचा निकाल झाला. या उमेदवारांना अर्जदाखल केल्यानंतर छाननी, अर्ज माघार घेणे आणि प्रचार करणे यास पुरेसा कालावधी मिळत नव्हता. नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा निवडणूक याचिका दाखल केली होती असे कळते.
निवडणूक आयोगाने ज्याठिकाणी न्यायालयीन अपील दाखल झालेले आहेत. त्या याचिकाकर्तेंसाठी निवडणूकांसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे.
बारामती नगरपरिषदेत प्रभाग क्र.13, 15 व 17 या प्रभागासाठी मे.कोर्टाने दिलेला निकालानुसार संबंधित याचिकाकर्तेंचा नामनिर्देशन अर्ज दाखल करून घेतला. आता या उमेदवारांना दि.10 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा वेळ मिळणार, चिन्ह वाटप करून यादी प्रसिद्ध करणे आणि दि.20 डिसेंबर रोजी मतदान व दि.21 डिसेंबर रोजी निकाल असा कार्यक्रम होणार आहे.
ज्या उमेदवारांनी ज्या प्रभागात निवडणूक याचिका दाखल केली त्याठिकाणी मे.कोर्टाने अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले त्यांनाच हा कार्यक्रम लागू असेल. इतर किंवा नव्याने कोणालाही नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
निवडणूकीचे वातावरण तापले असे म्हटले जाते मात्र, निवडणूक आयोगाच्या पत्रकामुळे तापलेले वातावरण सर्व शांत झाले.