बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सर्वसमावेशक व सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन बारामतीचा विकास केला आहे. बारामती नगरपरिषदेत समाजाच्या संख्येचा विचार करून प्रतिनिधीत्व देत आलेले आहेत. बारामती शहरात 18 हजार मुस्लीम समाजाची संख्या आहे. चार किंवा पाच जागेची मागणी असताना, दोन जागा दिल्या. प्रभाग क्र.15 चा सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला असता, सर्वसाधारण प्रवर्गातून दिलेली उमेदवारी चुकीची ठरत आहे.
ज्या उमेदवाराने कधी प्रचार केला नाही, जनतेशी कधीही थेट संपर्क नाही. पक्षाचा वर्धापन दिन कधी असतो हे माहिती नाही अशांना पक्षाने उमेदवारी देऊन संपूर्ण प्रभागाची नाराजी ओढवून घेतली आहे. उमेदवाराचे बंधू गेली तीन टर्म स्विकृत नगरसेवक म्हणून जागा घेत आले आहे. या टर्ममध्ये सुद्धा स्विकृत नगरसेवक असतील का? तसे झाले तर एकाच घरात दोन सख्ख्या भावांना उमेदवारी दिल्यासारखी होईल.
गेल्या तीस ते पस्तीस वर्षापूर्वी उमेदवाराचे बंधू नगरपरिषदेच्या निवडणूकीत पडले होते असे बोलले जाते. त्यामुळे ही निवडणूक लढवीत असताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. प्रभाग क्र.15 मधील मतदारांची संख्या पाहता व्यापारी, वाणी, कैकाडी, कोल्हाटी, ब्राह्मण इ. सारख्या समाजाला सामाहून घेतले जात नाही. एकतर्फी निवडणूक होईल, स्वतःच्याच पोळीवर तूप घेतल्याने, केलेला प्लॅन सक्सेस न झाल्याने अपक्ष उमेदवार यशपाल पोटे यांच्या रूपात तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने आणखीनच दमछाक होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडताना झालेल्या गोंधळामुळे निष्ठावंत कार्यकर्ता पक्षापासून दूर राहिला. प्रभाग क्र.15 मधील एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ नगरपरिषदेत आल्यावर ते पक्षास मान्य होणार का? असे मतदारांमध्ये बोलले जात आहे. कोणत्या समाजाला किती जागा दिल्या आणि उमेदवारी देण्यामध्ये अजितदादांपेक्षा कोणाचे किती वर्चस्व आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून 2 डिसेंबर रोजी किमान या प्रभागातील मतदार चाणक्य बुद्धीने मतदानाचा हक्क बजाविणार असल्याचेही दिसत आहे.
एकाच समाजातील प्रभाग क्र.10अ मध्ये आत्त्यास उमेदवारी दिली परंतु, भाच्याचे काम एकनिष्ठेने तत्परतेचे असताना त्यास पक्षाने टाळले. भाज्याबाने विचार न करता पत्नीचा अपक्ष अर्ज प्रभाग क्र.16 मधून दाखल केला. या भाज्याबाला इतका दबाव टाकला, प्रचारात सततचा मुद्दा घेतला जात होता. शेवटी त्याने पाठिंबा दिला. आत्त्या भाच्याबाचं नातं असताना असे होत असेल तर दोन सख्खे भाऊ बारामती नगरपरिषदेत आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य होणार का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.
प्रभाग क्र.15 ब मध्ये 6 उमेदवार आहे. अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव, उमेदवाराचा पत्ता आणि पक्ष असे अंतिम यादी प्रसिद्ध केली त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले. यामध्ये सर्व उमेदवारांचे सविस्तर पत्ते दिले आहेत पण एकाच उमेदवाराचा संपूर्ण पत्ता दिला नाही त्यामुळे हा उमेदवार नक्की प्रभाग क्र.15 मधीलच आहे की, आयात केलेला आहे हे मतदारांच्या मनात निर्माण करणारा खोचक प्रश्न आहे. ही निवडणूक अधिकाऱ्याची चूक म्हणायची का, उमेदवाराला मी कुठे राहतो हे सांगायचे नाही हेच कळत नाही.
प्रभाग क्र.15 मध्ये यशपाल पोटे यांचा प्रचार जोर धरू लागला तशी काही मंडळी हतबल होऊ लागली. बंधूप्रेमापोटी गल्ली बोळ फिरावे लागत आहे. हे आतापर्यंत कधी प्रचारात दिसले नाही, कधी स्वतःहून कोणाला फोन केला नाही. उलट एकाच ठिकाणी बसून उमेदवारी मिळणेसाठी समाजा-समाजात सुरू होणारी तू..तू..मै…मै… पाहत होते. जसं की, महाभारतात ध्रुतराष्ट्र संजयला सांगून रणभूमीत काय चाललय..अशी माहिती घेणारे चक्क प्रचाराच्या मैदानात उतरले विशेष रस्त्याने कोणलाही ओळख न देणारे आज हात जोडत आहेत, पाया पडत आहेत याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले आहे. कित्येक वर्ष मजा बघणारे आज त्यांचीच मजा बारामतीकर बघत आहेत. पराभव निश्चित आहे असेही बोलले जाता आहे. जर असे काही झाले तर नगरपरिषदेच्या निवडणूकीत बंधूला निवडून आणता आले नाही तर अजितदादांच्या तरीही जवळ जाणार का? व स्विकृत पदावर बसणार का? असेही मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
प्रभाग क्र.15 मध्ये प्रचारासाठी संपूर्ण बारामती तालुका उतरलेला दिसत आहे. या प्रभागात अटीतटीचा सामना पहावयास मिळणार आहे. यात जिंकणार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बारामतीच्या राजकारणातील ढवळाढवळ किंवा गट-तट मूळापासून घालवायचे असेल तर प्रभाग क्र.15 मधून कोण निवडून आला पाहिजे हे मतदारांना सांगण्याची गरज नाही.