बारामती(प्रतिनिधी)ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र.16 ब च्या महिला उमेदवार सौ.मंगल शिवाजीराव जगताप या स्थानिकच आहेत. आयात केलेला उमेदवार प्रभागात लादला असल्याच्या विरोधकांचा आरोपाचे खंडण करीत, त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे प्रचारा दरम्यान वक्तव्य अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष किरण इंगळे यांनी केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सौ.जगताप यांचे पती ॲड.शिवाजीराव तुकाराम जगताप हे प्रसिद्ध विधीतज्ञ आहेत. 1970 च्या दरम्यान याच प्रभागातील बाबरगल्ली येथील श्री.पेटकर यांचे घराचा पहिला मजला ऑफिस व विश्रांतीसाठी भाडेतत्वार घेतला. 1980 मध्ये नगरभूषण मा.नगराध्यक्ष स्व.कै.धो.आ.सातव उर्फ कारभारीआण्णा सातव यांनी वकिली व्यवसायातील प्रामाणिक व निस्वार्थपणा पाहत बाबुजी नाईक वाडा जुने तहसिल, प्रांत व शहर पोलीस स्टेशन समोरील जागा ऑफिस व निवासासाठी दिली.
सौ.जगताप यांनी दोन्ही मुले म्हणजे स्वप्नीलआण्णा आणि वैभव ही याच प्रभागातून म्हणजे बागवानगल्ली, गोकुळवाडी, तांदुळवाडीवेस, श्रावणगल्ली, कोष्टीगल्ली येथे खेळली बागडली आणि मोठी झाली. या दोघांच्या मनमिळावू स्वभावामुळे आसपासच्या युवकांशी अतुट असे संबंध निर्माण झाले. सर्व जातीधर्माला धरून त्यांच्या सुख-दुःखात हजेरी लावीत स्नेह वृद्धींगत केला. व्यापारी वर्गात स्नेहाचे व आपुलकीचे नाते प्रस्थापित केले.
सौ.जगताप यांचा मोठा मुलगा स्वप्निलआण्णा म्हणून या प्रभागात त्याचे नावलौकीक आजही आहे. त्याच्या सामाजिक, राजकीय घडामोडी याच प्रभागातून झाली. युवकांची निर्माण केलेली अतुट फळी पाहुन व तो करीत असलेल्या कार्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी त्यास दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात दुसऱ्यांदा संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली ही खुप जमेची बाजु आहे.
सौ.जगताप यांचा दुसरा मुलगा वैभव याची सामाजिक कार्याची सुरूवात अखिल तांदुळवाडी वेस दहिहंडी संघाच्या माध्यमातून सुरू झाली. दोघा मुलांवर झालेले आई-वडिलांचे उच्च संस्कारामुळे दोन्ही मुलं येथील युवकांच्या गळ्यातील ताईत होऊन बसली.
2023 मध्ये बारामतीचा प्रसिद्ध नवसाला पावणारा आबा गणपती च्या आर्शिवादानेच अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी वैभवची निवड सर्वानुमते करण्यात आली. ज्या मंडळास आतापर्यंत देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे अशा मंडळाचे अध्यक्षपद मिळणे ही कौतुकाची व अभिमानास्पद बाब होती. या संधीचा लाभ घेत निस्वार्थपणे अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत संधीचे सोनं केले याचा त्याच्या आई-वडिलांसह संपूर्ण प्रभागातील मित्र परिवारांना अभिमान वाटला.
सौ.जगताप यांची कर्मभूमी व मुलांची जन्मभूमी हा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागाला सौ.जगताप व त्यांचे कुटुंब नवखे नाही हे ही मतदारांनी जाणले पाहिजे. या सर्व बाबींचा विचार करीत, त्यांच्या कार्याची दखल घेत प्रभागातील सर्वच ज्येष्ठांचा व युवकांचा असणारे भक्कम असे पाठबळावर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025-30 चे प्रभाग क्र.16 ब सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सौ.मंगल शिवाजीराव जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
या प्रभागात त्यांना व त्यांच्या मुलांना कोण ओळखत नाही असे नाही. या प्रभागातील प्रलंबित प्रश्न, अधिकचा विकास व तुम्ही कधीही हाक द्या त्या हाकेला प्रतिसाद देत काम करून दाखविण्याची अमूल्य संधी सौ.जगताप यांना मिळालेली आहे. तरी मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता या प्रभागातील स्थानिकच आहेत व सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आहेत. यावर मनात कोणताची संकोच न बाळगता विश्वास ठेवत भरघोस मतदान रूपी आशिर्वाद द्यावे असेही इंगळे यांनी बोलताना सांगितले.