बारामतीः गेली 18 वर्ष अखंड सामाजिक कार्याची परंपरा जोपासणारे शिक्षण, रोजगार, विकास आणि सर्वसमावेशक उपक्रमांच्या माध्यमातून बारामतीत आदर्श निर्माण करणारे समाजकर्ते आलताफ सय्यद असल्याचे प्रभाग भेट दौऱ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांनी बोलताना सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव, प्रभाग क्र.17 चे बिनविरोध उमेदवार श्रीमती शर्मिला ढवाण, आलताफ सय्यद व बहुसंख्य मतदार मित्र परिवार उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री सातव म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यातील सहभागामुळे अतुट असे युवकांचे जाळे निर्माण केले आहे. गेली 18 वर्षापासून ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 300 कुटुंबियांना शिर्रर्खुमा बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचे वाटप करीत आहे. राज्यमंत्री फौजीया खान यांच्या शुभहस्ते शहरातील नागरिकांना मोफत जातीचे दाखल्यांचे वाटप केले. युवक रोजगार मेळाव्याचे आयोजन करून शिका व कमवा योजनेतून 1 हजार 100 मुलांना नोकरी प्राप्त करून देण्यात यशस्वी उपक्रम राबविला. सन 2010 साली किचकट वाटणारी पासपोर्ट प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ करून कार्यक्रमाचे आयोजन करीत 150 नागरिकांना पासपोर्ट काढून देण्याचे काम त्यांनी केले.
बारामती शहरातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना एकत्रित करून एकता महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. गेली 11 वर्षापासून मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी कार्यरत असुन बँकेच्या माध्यमातून जवळपास 50 कोटी रुपयांचे कर्ज छोटे व्यावसायिकांना देऊन राजगार निर्मितीला गती देण्याचे कामही त्यांनी केले.
प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकता इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ची स्थापना केली. नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकास कामांना मंजुरी मिळवून देण्यात आली. सामाजिक भान व जान जपत करोना काळात हातावरचे पोट असणाऱ्यांना घरी जात अन्नधान्य पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.
पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रमाने वाढदिवस साजरा करीत आलेले आहेत. अजितदादा उपमुख्यमंत्री विराजमान झालेने बारामतीत भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व व्यवसायिकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा यशस्वी उपक्रम राबविला. विशेष बाब म्हणजे समाजातील गरजवंत नागरिकांना एकत्रित करून एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करीत तब्बल 100 रो हाऊस चे गृहप्रकल्प करून तो प्रकल्प अंतिमटप्प्यात आहे. अशी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी भरीव अशी कामे केलेली आहेत. त्यामुळे असे नगरसेवक पदाचे उमेदवार नगरपरिषदेच्या कारभारात जाणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
आलताफ सय्यद हे दि मुस्लीम को-ऑप बँकेचे संचालक आहेत. एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष आहेत. एकता महिला नागरी सह.पतसंस्थेचे संस्थापक आहेत. मेडद याठिकाणी स्थापन केलेल्या एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आहेत. युवकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळावे त्यांचा उद्धार व्हावा या उद्देशाने एकता ग्रुप स्थापन केला त्या ग्रुपचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभागाचे ते माजी अध्यक्ष आहेत.
प्रभाग क्र.17अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते उमेदवारी लढवीत आहेत. सामाजिक एकोपा, विकास आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर ठाम भूमिका मांडणारा हा उमेदवार सर्वसमावेशक नेतृत्वावर भर देत आहे व यापुढे देणार आहे. “सर्व धर्म, जात, पंथ आणि समुदाय एकत्र आणणारा प्रशासनाचा चेहरा” होण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अशा उमेदवारास येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी प्रभाग क्र.17 मधील मतदार राजाने बहुमताने निवडून द्यावे व आपल्या प्रभागाचा परिपक्व उमेदवार नगरपरिषदेत आपली भक्कम बाजु मांडणारा पाठवावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.