बारामती(प्रतिनिधी)ः राज्य निवडणूक आयोगाने वादग्रस्त आदेशामुळे बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची निवडणूक रद्द करण्याची याचिका सिद्धी प्रतिक अक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या याचिकेवर आज म्हणजे 4 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीस राज्य निवडणूक आयोग, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व रिटर्निंग ऑफिसर यांना अवगत करण्यात आले आहे.
याचिकाकर्ते सौ.अक्कर यांचे म्हणणे आहे की, चालू निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुर्ननिवडणूक प्रक्रिया करण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रिया रद्द करणे किंवा नविन निवडणूक कार्यक्रमाच्या आधारे ती पुढे ढकलणे हे प्रथमतः बेकायदेशीर आणि अधिकार क्षेत्राबाहेरचे आहे.
निवडणूक प्रक्रिया लागू झालेनंतर या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला नाही. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एन.पन्नुस्वामी विरूद्ध रिटर्निंग ऑफिसर लँडमार्क निकाल दिलेला आहे. या निकालावरून निवडणूक आयोगाने केलेले हस्तक्षेप बेकायदेशीर आहे.
निवडणूक आयोगाने 4 डिसेंबर रोजीची नव्याने निवडणूक प्रक्रिया जारी केली आहे. कायद्याने आयोगाला ही निवडणूक प्रक्रिया चालू ठेवता येणार नाही. संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही उलट पुन्हा नव्याने नगरपरिषद निवडणूक जाहीर कराव्या लागतील असेही याचिकाकर्ते यांनी याचिकेत म्हटले आहे.
याचिकाकर्ते यांच्या वतीने ॲड.सुशांत प्रभुणे हे कामकाज पाहत आहेत. न्यायालयाच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागून आहे.