अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने केलेला सन्मान व मानपत्रामुळे आणखीन जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादान प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार यांनी केले.
दि.14 रोजी इंदापूर पंचायत समिती येथे अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार यांनी तब्बल 42 वर्ष यशस्वीपणे वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान दिल्याबद्दल व कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, मुख्याधिकारी रामराजे कापरे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, नगरसेवक भरत शहा, जगदिश मोहिते, नगरसेविका अनिता धोत्रे, सुवर्णा मखरे, मनिषा शिंदे, रजिया हजरत शेख, मीना ताहेर मोमिन, भाजपा शहराध्यक्ष शकिल सय्यद, पांडुरंग शिंदे, डॉ अविनाश पानबुडे, युवा नेते दत्तात्रय पांढरे, अमोलराजे इंगळे, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.इनामदार म्हणाले की, जेवढे अकलूजकरांनी प्रेम दिले तेवढेच इंदापूरकरांनी दिले. दोन बेडवरून शंभर बेडचे हॉस्पीटल या प्रेमामुळे झाले. कोरोनाच्या प्रारंभी मी स्वत: पॉझिटिव्ह आलो. अशा अवस्थेत अतिदक्षतेत असणार्या रूग्णांची काळजी घेतली. दोन हजाराच्या वर रूग्णांना जीवनदान देण्यास यश आले. या यशामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांचे मला मोलाचे सहकार्य लाभले. बिकट परिस्थितीमध्ये रूग्ण बरा करणे एवढेच डॉक्टरांच्या हाती असते. हे आत्मसात केल्याने अनेक रूग्ण बरे केले असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, माझा लहानपणापासून डॉ.इनामदार यांचा संबंध आहे. ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. डॉक्टरांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून इंदापूर नगरपालिकेच्या वतीने मानपत्र देण्यात आला इंदापूर नगरपालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहाणारा असा हा क्षण आहे. वयाच्या 71 वर्षे असताना देखील वैद्यकीय उपचार देत आहेत. डॉक्टर इनामदार यांचे नाव घेताच रुग्ण पन्नास टक्के बरा झालेला असतो. इंदापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी कोरोनामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत हजारो लोकांना जिवदान दिले असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्षा सौ अंकिता शहा म्हणाल्या की, 2019 साली कोरोनाच्या महामारीत संकटकाळी नगरपरिषदेच्या वतीने आम्ही व आमच्या कर्मचार्यांनी काम करुन कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. डॉ.इनामदार हे देव आहेत त्यांनी कोरोनाच्या महामारी मध्ये उत्कृष्ट काम करून हजारो लोकांचे जिव वाचवले. इंदापूर शहरातील डॉक्टर व डॉ.इनामदार इनामदार हे खरे निडर आहेत त्यांच्या कार्याला सलाम करते असेही त्या म्हणाल्या.
गनिजबुक मध्ये रेकॉर्ड करणारी इंदापूर ची कन्या प्राजक्ता पाटील हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ अविनाश पानबुडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरपालिका कर्मचारी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.