बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी भराणा केंद्र सुरु व्हावे याकरिता नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. तथापि काही तांत्रिक अडचणींमुळे बर्याच दिवसांपासून हा विषय प्रलंबित होता. मात्र आता सर्व अडथळे दूर करून नागरिकांच्या सोयीसाठी रुई, ,जळोची व तांदुळवाडी या तीनही क्षेत्रिय कार्यालयामध्ये आज मंगळवार दि 8 फेब्रुवारी 2022 रोजी बारामती शहराच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याहस्ते संगणकीय मालमत्ताकर (घरपट्टी), पाणीपट्टी भराणा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
सदरील भराणा केंद्रांवर नागरिकांना सकाळी ते सायं 06 या वेळेत आपल्या मालमत्ताकर (घरपट्टी), पाणीपट्टी कराचा भरणा करता येणार आहे.
त्याचबरोबर सदरहू क्षेत्रिय कार्यालयामध्ये जन्म दाखला, मृत्यू दाखला, रिव्हिजन उतारा आणि थकबाकी नसलेला दाखला आदि सुविधा मिळणार आहेत.यांकरिता नागरिकांना नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून नगरपालिकेच्याही मुख्य कार्यालयातील भार काहीअंशी हलका होणार असल्याने सर्व नागरिकांना वेळेत सेवा देता येणे शक्य होणार असल्याने नगराध्यक्षांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

आज रुई येथे 1,76,443 तर जळोची येथे 94,026 आणि तांदुळवाडी येथे 57,976 असा एकूण रुपये 3,28,445 मालमत्ता आणि पाणीपट्टी कराचा मा. सदस्य , मान्यवर व नागरिकांकडून भरणा करण्यात आला.
सदरहू उदघाटनप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, सदस्य सौ सुरेखा चौधर, विष्णु चौधर, सौ.नीलिमा मलगुंडे, सौ.आशा माने, सौ.सविता कोकरे, सौ.ज्योती सरोदे तसेच किशोर मासाळ, अविनाश लगड, प्रताप पागळे, शैलेश बगाडे आदी शहरातील मान्यवर उपस्थित होते. कर निरीक्षक गौरव दुरूगकर, सचिन खोरे, क्षेत्रिय अधिकारी सुनील दुबे, संगणक विभागाच्या दीपाली ठाकूर, अतिक्रमण व जाहिरात विभागाचे महेश आगवणे, मालमत्ता कर विभागाचे इकबाल शेख, भारत गदाई, दीपक पंजाबी, देविदास साळुंखे व उर्वरित सर्व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी आपापली चालू घरपट्टी भरून नागरिकानाही आपापला मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करण्याचे आवाहन केले. तसेच ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी नागरिकांनी www.baramatimunicipalcouncil.in या वेबसाईटचा वापर करावा.