श्री साई गणेश महिला बचत गटाचा पर्यावरण पूरक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

बारामती(वार्ताहर): श्री साई गणेश महिला बचत गटाचा पर्यावरण पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रम माता रमाई भवन वडकेनगर बारामती येथे करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती नगरपरिषद प्रभाग क्र.17 च्या नगरसेविका सौ.मयुरी सुरज शिंदे, बा.न.प. बचत गट समन्वय अली मुल्ला, क्षेत्रीय समन्वयक सौ वैशाली अकीवाटे त्यांच्या सहयोगी सलमा तांबोळी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण गीत सादर करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमास महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. सिद्धिविनायक बचत गट अध्यक्षा सौ.अनिता आहिवळे यांचा सत्कार शकीला कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी लक्ष्मी कांबळे, नीता साबळे, काजल साबळे, पुष्पा फसले, संध्या भोसले, उज्वला मोरे, आरती महाले, सरिता महाले, माया सोनवणे, सिद्धी अहिवळे, वीरा देवकुळे,वैष्णवी महाले,राणी माहाले, आरती मोरे, शुभांगी महाले तसेच सागर सोनवणे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार बचत गटाच्या अध्यक्षा सुषमा देवकुळे, सचिव सौ.प्रिया रणधीर, अश्र्विनी कांबळे, स्वाती महाले यांच्या हस्ते गुलाब पुष्प व तुळशीचे रोप वाण म्हणून देण्यात आले. तुळस ही आरोग्यदायी वनस्पती असल्याने तसेच 24 तास ऑक्सिजन पुरवठा करणारी असल्याने गटातील सर्व सदस्य उपस्थित महिलांना तुळशीचे रोप वाण म्हणून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!