बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बी.डी.कोकरे तर उपाध्यक्षपदी ऍड.अजित शेरकर व ऍड.राजकिरण शिंदे

बारामती(वार्ताहर): बारामती वकील संघटनेची सन 2022-23 ची निवडणूक नुकतीच पार पडली असुन, अध्यक्षपदी ऍड. बी.डी.कोकरे तर उपाध्यक्षपदी ऍड.अजित शेरकर व ऍड. राजकिरण शिंदे हे बहुमताने निवडून आले.

या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या रिंगणात ऍड. बी.डी.कोकरे, ऍड.विशाल विजयराव बर्गे व अविनाश गायकवाड हे उमेदवार उभे होते. यामध्ये ऍड.कोकरे हे बहुसंख्य मते मिळवीत विजय प्राप्त केला.

उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी निवडणुकीत ऍड. अजित शेरकर व ऍड.राजकिरण शिंदे विजयी झाले. सचिवपदी संदीप पाटील, सहसचिवपदी सोहेल शेख, खजिनदारपदी ऋषिकेश निलाखे, ग्रंथपालपदी प्रीतम क्षीरसागर तर महिला प्रतिनिधी या जागेसाठी उषा गावडे पोंदकुले या विजयी झाल्या.

या निवडणुकीसाठी ऍड.राजेंद्र काळे, ऍड.विजय तावरे, ऍड.डी.टी.शिपकुले, ऍड. संजय टकले, ऍड.नितीन अवचट, ऍड. प्रवीण कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

विजयी उमेदवारांचे वकील संघटनेचे मावळते अध्यक्ष चंद्रकांत सोकटे, सचिव अजित बनसोडे, उपाध्यक्ष स्नेहा भापकर, ग्रंथपाल स्वरूप सोनवणे यांनी अभिनंदन केले व सत्कार केला.

मानमरातब आणि पैसा याखेरीज कामाचे समाधान मिळवून देणारे वकिली क्षेत्र आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांचे प्रमाण वाढत असल्याने अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी कोर्टाची पायरी चढणार्‍या सर्वसामान्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वकीलीची किंमत समाजाला कळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!