बारामती(वार्ताहर): शहरातील कमी कालावधीत प्रसिद्ध झालेले हॉटेल साहेब सरकारला कर्जत नगरपंचायतीचे सदस्य भाऊ तोरडमल व भास्कर भैलुमे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी हॉटेलचे मालक कासम कुरैशी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी नगरसेवक गणेश सोनवणे, नितीनबाळू सोनवणे, महेबुब कुरैशी, आवेज सौदागर, रेशम तांबोळी, सलीम शेख सर्व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.
पारंपारीक व्यवसायाला कलाटणी देवून कासम कुरैशी यांनी हॉटेल साहेब नंतर हॉटेल साहेब सरकार सुरू करून बारामतीतील खवय्या आकर्षित केलेले आहेत. हॉटेल साहेब सरकार उद्घाटनापासून विविध प्रतिष्ठीत मान्यवरांनी भेट देवून येथील असणार्या उत्तम दर्जाच्या पदार्थाचे कौतुक केले आहे. तालुक्यातील खवय्यांसाठी एक अग्रगण्य नाव साहेब सरकार होत आहे.