सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने रथसप्तमी व माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त स्वच्छतेचे वाण वाटप

अशोक घोडके यांजकडून…
सरडेवाडी(वार्ताहर): ग्रामपंचायत सरडेवाडीच्या वतीने रथसप्तमी व माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलांकरीता हळदी-कुंकू समारंभ व स्वच्छतेचे वाण वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी सर्वप्रथम राजमाता अहिल्यादेवी, मॉंसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई, माता रमाई यांच्या संयुक्त प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या प्रियंका शिद, वैशाली शिद, सुप्रिया कोळेकर, अलका कडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सोनाली जानकर, सचिव नकुसा जमदाडे, कोषाध्यक्षा सारिका सरडे, ग्रामसेविका स्वाती चव्हाण, आशासेविका कामिनी सिताप, वर्षा तरंगे, अंगणवाडीसेविका दक्षता ढावरे, छाया कदम, गंगूबाई सिताप, अलका ढावरे, प्रियंका शिंदे, पंचायत समिती नरेगा सहायक कार्यक्रम अधिकारी पूनम सरडे, गयाबाई तोबरे, वैशाली कोळेकर, माजी सरपंच मोहिनी सरडे, निर्मला जाधव इ. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वच्छतेचे वाण म्हणून महिलांना सॅनिटरी नॅपकिन व कापडी पिशवी वाटण्यात आली. यावेळी गावातील सर्व महिलांनी बचतगटांमध्ये सक्रिय सहभागी होऊन शासकीय सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी उपस्थित सर्व महिलांना केले.

ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया कोळेकर यांनी आभार मानले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्वच्छतेचे वाण वाटप कार्यक्रमाचे गावातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!