अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने सोमवार दि.7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10:15 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात माता रमाबाई आंबेडकर यांची 124 वी जयंती साजरी करण्यात आली.
त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित,बोधिसत्व, युगांचा युगांधर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील कर्तव्यदक्ष त्याग मूर्ती विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता.
यावेळी माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे यांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव ड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संचालिका अस्मिता मखरे, संस्थेतील प्राचार्या, उप- प्राचार्या, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.