बारामती (वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यातील पश्र्चिम भागातील एका गावाला जनसुविधा निधीतून कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे मात्र पुण्यात बसून गावच्या कामात ढवळाढवळ करणार्याच्या जि.प.सदस्याच्या अजितदादा मुसक्या आवळणार का? याबाबत ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
या गावासाठी दिलेल्या विकास कामात हा सदस्य व माजी जि.प.सदस्य व त्याचे बगलबच्चे सुद्धा विकास कामात अडथळा निर्माण करीत आहेत. या गावच्या प्रमुखांनी थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सदस्यांचे मुसक्या आवळणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका जिल्हा परिषद गटात आयात उमेदवार दिला होता. या निवडणूक प्रचारावेळी आयात-निर्यात उमेदवार बघू नका, मी उमेदवार दिला आहे, काय काम असेल तर मला सांगा.. काम नाही झाले तर बोला असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. मतदारांनी दादांचा शब्द पाळत उमेदवार निवडून आणला, मात्र हा आयात केलेला उमेदवार जसा निवडून गेला तसा पुन्हा या गटात ढूंकून सुद्धा पाहिले नाही.
येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी पाहता अजितदादांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांना या गावच्या विकास कामाबाबत जास्त लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार श्री.होळकर यांनी अनेक विकास कामात स्वतः लक्ष देऊन ही विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री विकास कामात अडथळा करणार्या देव-देवतांना सुद्धा विचार करीत नाही. मात्र त्यांनी दिलेल्या विकास निधीतून होणार्या कामात मात्र हे जि.प.सदस्य, माजी सदस्य अडथळा घालीत असतील तर बारामती दौर्यावर आल्यावर दादा कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेले आहे.