बारामती(वार्ताहर): जुन्या वादातून दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रस्त्याने जात असताना महेश धोत्रे, गणेश तुळशीराम पवार (रा.पिडीसीसी बँक जवळ, आमराई) यांनी पिडीत मुलीचा हात पकडला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अशी फिर्याद दिली. त्यानुसार दोघांवर विनयभंग व पोस्को गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
भरत पवार, युवराज पवार व राजू धोत्रे (रा.पोस्ट ऑफिस जवळ, आमराई) या तिघांनी महिलेला मारहाण करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन जुन्या भांडणाच्या कारणावरून केले अशी फिर्याद दिल्याने भा.द.वि. कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दोन्ही महिलांची तक्रार तात्काळ दाखल करून दोन्ही बाजूचे लोकांना अटक केली आहे. गु.र.नं.38 व 39 असे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे व पोलीस हवालदार काळे हे दोन्ही गुन्ह्याचे तपास करत आहेत.