विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबवून, संस्था चालकांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची आरपीआयची मागणी

बारामती(वार्ताहर): येथील कै.ग.भि.देशपांडे विद्यालय व उच्च माध्य विद्यालय या शाळेत अनुसुचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांचे होत असलेले आर्थिक शोषण थांबवून संबंधीत विद्यालयातील संस्था चालकांसह मुख्याध्यापक, स्थानिक समितीवर अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे जिल्हा शिक्षण विभाग यांना लेखी स्वरूपात केली आहे.

कै.ग.भि.देशपांडे विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय ही शाळा शासनाच्या 100 टक्के अनुदानित शाळांमध्ये समाविष्ट आहे. शासनाच्या धोरण व निर्णयाप्रमाणे अनुसुचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे शासनाचे नियम व धोरण आहेत म्हणजेच कायदा आहे, असे असताना देखील जातीय द्वेषातुन संस्थाचलाक व मुख्याध्यापक शिक्षकांच्या मदतीने अनुसुचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांवर आर्थिक अन्याय करीत आहेत. अनेक विद्यार्थ्याचे गुणपत्रक दिले जात नाहीत तसेच पालकांना भ्रमणध्वनीवर फी भरण्यासंबंधी आग्रह धरला जात आहे, त्यांच्या स्वाध्याय वहया स्विकारल्या जात नाहीत असे करणे म्हणजे विद्यार्थी व पालकांवर घोर अन्याय आहे. शासन निर्णय व कायद्याचा अवमान केला जात आहे, आर्थिक शोषण व नफेखोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील संबंधीत शाळेमध्ये असणारे संस्थाचालक व मुख्याध्यापक हे कायदा न जुमानणारे, जातीयद्वेषाने भरलेले विकृत मनोवृत्तीचे आहेत तरी त्यांच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. शासन निर्णयाचा अंमल करण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आपणाविरूध्द तीव्र आंदोलन करणार आहे याची नोंद घ्यावी.

कै. ग.भी.देशपांडे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत अनुसुचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांचे होत असलेले आर्थिक शोषण थांबवून संबंधीत विद्यालयातील मुख्याध्यापक,संस्था चालक आणि स्थानिक समितीवर अनुसुचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतचे लेखी निवेदन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मा.जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, पुणे यांना देण्यात आले.यावेळी मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे – युवक सरचिटणीस पुणे जिल्हा रिपाइं (आठवले) तसेच मा.सम्राट गायकवाड -शहर सचिव रिपाइं (आठवले) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!