बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेतील नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी अंतिम टप्प्यात असताना, आजही काही नगरसेवक नागरीकांचा विचार करून, त्यांची गरज पाहुन काम करीत आहेत यामध्ये क्रीयाशिल नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी स्वत:ची जबाबदारी न झटकता दहा दिवसातच दारात विजेचा खांब बसवून आज-उद्या परिसरत प्रकाशमय केल्याने स्थानिक नागरीकांनी बल्लाळ यांच्या कामाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांचा 19अ प्रभाग असताना त्यांनी प्रभाग 17 मधील नागरीकांची गरज ओळखून काम मार्गी लावले. आमराई येथील सर्वादयनगर येथे नगरसेवक बल्लाळ आणि शाम जाधव संध्याकाळी चर्चा करीत असताना, याठिकाणी ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम केलेल्या खड्ड्यामध्ये वयोवृद्ध इसम पडला असता, तातडीने बल्लाळ, शाम जाधव यांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले. ही घटना का घडली ही घटना त्यांना बैचेन करीत होती. याठिकाणी असणारा अंधारामुळे सदरील वृद्ध पडल्याचे लक्षात आल्याने बल्लाळ यांनी केलेल्या प्रयत्नातून दहा दिवसात विद्युत खांब बसविला लवकरच येथील परिसर प्रकाशमय होईल. त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे येथील स्थानिक नागरीकांनी बल्लाळ यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.