इंदापूर: इंदापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे (वय-79) यांचे बावडा येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने आज दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले.
विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अनेक विषयांवर विपूल लिखाण केले होते. जोशी अभ्यंकर हत्यकांड निकालावेळी रमांकांत तोरणे यांनी एका वृत्तपत्रात फाशीची शिक्षा असावी की नसावी?, फाशीची शिक्षा म्हणजे सूड नव्हेया विषावर एक विशेष लेख लिहला होता. या लेखाचे तत्कालीन न्यायधिश चंद्रचूड सिंग यांनी कौतुक करून निकालावेळी या लेखाचा संदर्भ दिला होता. या लेखाचे संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते. यांनतर न्या. चंद्रचूड सिंग यांनी त्यांना पत्र पाठवून या लेखाचे कौतुक केले होते. रमाकांत तोरणे यांच्या मृत्यू पश्चात दोन विवाहित मुले, पाच विवाहित मुली सूना, नातवंडे असा परिवार आहे.